कोरोनामुळे जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, १८० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:28+5:302021-06-05T04:25:28+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ४०, खामगाव १८, शेगाव १७, देऊळगाव राजा २८, चिखली ९, मेहकर १०, मलकापूर ६, नांदुरा ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ४०, खामगाव १८, शेगाव १७, देऊळगाव राजा २८, चिखली ९, मेहकर १०, मलकापूर ६, नांदुरा १०, लोणार १३, मोताळा ५, जळगाव जामोद ११, सिंदखेड राजा ८ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५ जणांचा यामध्ये समावेश आहे.
उपचारादरम्यान मलकापूर येथील रामवाडी परिसरातील ४४ वर्षीय व्यक्ती, खामगावमधील ४४ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील उटी येथील ७० वर्षीय पुरुष आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे २८९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालापैकी ४ लाख ९६ हजार ७७४ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ८३ हजार ५८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--५८१ अहवालांची प्रतीक्षा--
शुक्रवारी आरोग्य विभागाने ५८१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८५ हजार ४१२ झाली असून, १ हजार २०२ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.