कोरोनामुळे जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, ६५४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:55+5:302021-05-12T04:35:55+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ७६, खामगाव तालुक्यातील १४८, शेगाव तालुक्यातील १३, देऊळगाव राजा तालुक्यातील ७१, चिखलीमधील १०४, मेहकरमधील ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ७६, खामगाव तालुक्यातील १४८, शेगाव तालुक्यातील १३, देऊळगाव राजा तालुक्यातील ७१, चिखलीमधील १०४, मेहकरमधील ७, मलकापूरमधील ३०, नांदुऱ्यातील १७, लोणार तालुक्यातील १०५, मोताळ्यातील ३८, जळगाव जामोद मधील १३, सिंदखेड राजामधील २१, संग्रामपुर तालुक्यातील ११ जणांचा समोश आहे. उपचारादरम्यान कोरोनामुळे मंगळवारी चार जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खामगाव तालुक्यातील कंझारा येथील ५५ वर्षीय महिला, खामगावातील जलंब नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील ६० वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील धाड येथील ६० वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या ४८५ झाली आहे. दरम्यान, ९४३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
-- संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह--
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३,९३,१२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आतापर्यंत ६८ हजार १७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही ३,९२७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७२ हजार ७३५ झाली आहे. त्यापैकी ४०८० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत ४८५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.