कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ८४ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:39+5:302021-06-28T04:23:39+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील चार, शेगाव तीन, देऊळगाव राजा १०, चिखली तीन, मेहकर आठ, नांदुरा एक, लोणार ४९, ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील चार, शेगाव तीन, देऊळगाव राजा १०, चिखली तीन, मेहकर आठ, नांदुरा एक, लोणार ४९, मोताळा तीन, जळगाव जामोद तालुक्यातील तिघांचा समोश आहे. दरम्यान खामगाव, मलकापूर, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यातील एकही संदिग्ध तपासणीमध्ये बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये शिवशंकरनगरमधील ७७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान ५० जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ६६ हजार ५१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकूण बाधितांपैकी ८५ हजार ८१७ जणांनी कोरोनावर आजपर्यंत मात केली आहे.
--१२१२ अहवालाची प्रतीक्षा--
अद्यापही तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १२१२ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८६ हजार ५९९ झाली आहे. पैकी १२२ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.