बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाचा मृत्यू, ५३३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 11:20 AM2021-03-16T11:20:19+5:302021-03-16T11:20:31+5:30

CoronaVirus News बुलडाणा शहरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीचा काेरोनामुळे मृत्यू झाला.

Corona kills one in Buldana district on Monday, 533 positive | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाचा मृत्यू, ५३३ पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाचा मृत्यू, ५३३ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २०९३ जणांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यापैकी ५३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १५६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बुलडाणा शहरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीचा काेरोनामुळे मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर ९५, जांबुळधाबा १, वडोदा १, वरखेड १, निमखेड १, विवरा ३, भाडगणी १, आळंद ११, कुंड बु. १६, देवधाबा ११, बुलडाणा ८६, गोंधनखेड १, धाड २, मासरूळ २, डोंगरखंडाळा १, साखळी बु. १, उमाळा ३, नांद्राकोळी ३, रुईखेड टेकाळे १, पोखरी ३, चिखली २२, केळवद १, शेलसूर १, शेलूद २, पेठ १, करवंड १, हातणी २, टाकरखेड १, इसरूळ १, सवणा १, किन्होळा ३, मेहकर २, हिवरा आश्रम १, शेगाव ५८, जवळा ५, माटरगाव १, जलंब ८, गौलखेड १, झाडेगाव १, लासुरा १, खामगाव ७३, पिंप्री कोरडे १, लाखनवाडा १, शिर्ला नेमाने १, हिवरखेड २, टेंभुर्णा १, अंत्रज २, पोरज ४, घाटपुरी ३, पळशी ३, अटाळी १, चिंचपूर ४, गणेशपूर १, धामणगाव दे. १,उकडगाव १, पातुर्डा २, सोनाळा २, वरवट बकाल १, लोणार २, भानखेडा २, पळसखेडा २, मोताळा २, दाभाडी ३, शेलापूर २, राजूर ७, कोथळी १, शिरसोळी २, जिगाव १, निमगाव १, जळगाव जामोद ५, आसलगाव ३, अंढेरा १, दगडवाडी १, सुरा १, सिनगाव जहा. २, दे. राजा ६, गुंज १, वसंतनगर ५, शिवणी टाका २, चिंचोली १, निमागाव १, सिं. राजा ४ आणि वैभवनगर धुळे येथील एक, जालना जिल्ह्यातील मंठा येथील १, अकोला १, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील १, जळगाव खान्देश जिल्ह्यातील पारंबी एथील एक,  आणि जालना जिल्ह्यातील इंचा येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील केशवनगरमधील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  दुसरीकडे ४६२ जणांनी सोमवारी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Corona kills one in Buldana district on Monday, 533 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.