कोरोनामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, ८८५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:00+5:302021-03-19T04:34:00+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ११९, खामगाव तालुक्यातील १२९, शेगाव तालुक्यातील ३१, देऊळगाव राजा तालुक्यातील ८५, चिखली तालुक्यातील ३१, मेहकर ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ११९, खामगाव तालुक्यातील १२९, शेगाव तालुक्यातील ३१, देऊळगाव राजा तालुक्यातील ८५, चिखली तालुक्यातील ३१, मेहकर तालुक्यातील १०, मलकापूर तालुक्यातील १२४, नांदुरा तालुक्यातील ८५, लोणार तालुक्यातील २६, मोताळा तालुक्यातील ३२, जळगाव जामोद तालुक्यातील ८७, सिंदखेड राजा तालुक्यातील ९२ आणि संग्रामपूर तालुक्यातील १४ जणांचा यामध्ये समावेश आहे.
नांदुरा तालुक्यातील ७३ वर्षीय व्यक्ती, मलकापूरमधील आदर्शनगरमधील ६५ वर्षीय व्यक्ती आणि बुलडाणा शहरातील छत्रपतीनगरमधील ८३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान, ४३३ जणांनी गुरुवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सोबतच आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख ७२ हजार ४५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आजपर्यंत २३ हजार ११६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७ हजार ८०५ झाली आहे. त्यापैकी ४,४६० सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.