कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, चार जण बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:36 PM2021-07-25T12:36:30+5:302021-07-25T12:36:35+5:30
Corona kills two in Buldana district: शनिवारी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार जण कोरोना बाधीत आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात शनिवारी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार जण कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान रुग्णालयात सध्या १६ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी १ हजार ८१४ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यापैकी १ हजार ८१० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव तालुक्यातील एक, शेगाव तालुक्यातील एक, नांदुरा तालुक्यातील एक आणि जळगाव जामोद तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील नागझरी येथील ८० वर्षीय महिला व देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथील ३३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २७ हजार ४३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ८६ हजार ५४६ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी तपासण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी आरटीपीसीआरव्दारे ४१० आणि रॅपीड टेस्ट कीटव्दारे १४०० संदिग्धांचे अहवाल तपासण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.