कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, चार जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 12:28 PM2021-07-26T12:28:32+5:302021-07-26T12:28:38+5:30
Buldhana Corona Cases : मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील ७९ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील ७९ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. दरम्यान, संदिग्धांच्या तपासण्यात आलेल्या अहवालानंतर चार जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दुसरीकडे सध्या रुग्णालयांमध्ये १७ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ७१९ संदिग्धांच्या अहवालांपैकी १ हजार ७१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील सुकळी येथील एक, शेगाव शहरातील एक, देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील एक, सिंदखेडराजा शहरातील एकाचा समावेश आहे. डोणगाव येतील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दुसरीकडे २ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २८ हजार ७५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आजपर्यंत ८६ हजार ५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला.