कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, चार जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:19+5:302021-07-26T04:31:19+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ७१९ संदिग्धांच्या अहवालांपैकी १ हजार ७१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर चार ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ७१९ संदिग्धांच्या अहवालांपैकी १ हजार ७१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील सुकळी येथील एक, शेगाव शहरातील एक, देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील एक, सिंदखेडराजा शहरातील एकाचा समावेश आहे. डोणगाव येतील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दुसरीकडे २ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २८ हजार ७५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आजपर्यंत ८६ हजार ५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
--१,८११ अहवालांची प्रतीक्षा--
संदिग्ध म्हणून तपासणीसाठी स्वॅब घेतलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८११ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८७ हजार २३७ झाली आहे. यापैकी प्रत्यक्षात १७ सक्रिय रुग्णांवरच रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत एकूण ६७२ जमांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.