कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:01+5:302021-07-05T04:22:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : सध्या कोरोनामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवायची भीती वाटत आहे, तर घरात बसून ...

Corona makes kids 'fat'! | कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’!

कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : सध्या कोरोनामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवायची भीती वाटत आहे, तर घरात बसून मुले कंटाळत असून, टीव्ही व मोबाईल सोडायला तयार नाहीत. यातच घरी राहून जास्त खाद्यपदार्थ खाण्यात येत असल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असून, पालकांसमोर ही नवी चिंता वाढत आहे.

मागील दीड ते दोन वर्षांपासून मुलांना कोरोनामुळे घराबाहेर फिरून खेळण्यास जणू बंदीच असल्याची स्थिती आहे. पालक कामात व्यस्त असल्याने वीकेंडला तेवढी मुले घराबाहेर पडतात. एरवी घरातच राहणारी मुले ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईलसमोर अथवा विविध कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्हीसमोरच राहत आहेत. यादरम्यान ते मोबाईल पाहत अथवा टीव्ही पाहतच जेवण करीत असल्याने त्यांच्यात लठ्ठपणा येत आहे. जेवताना आपण किती जेवतोय, याचेच भान टीव्ही पाहताना राहत नाही. त्यातच व्यायाम बंदच झाल्यात जमा झाल्याने मुलांमध्ये लठ्ठ्पणा येताे. त्यामुळे पालकांना आता शाळा कधी सुरू होतील व कोरोनाचा कहर कधी संपेल, याची चिंता लागली आहे.

वजन वाढण्याची कारणे

मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून, घरातच जास्त राहत आहेत. त्यातच विविध पदार्थ खायला मिळू लागले आहेत.

टीव्ही पाहत जेवण करण्याची सवय वाढू लागली आहे. टीव्ही पाहताना क्षमतेपेक्षा जास्त खात असल्याचे दिसून येत आहे.

फास्ट फूडचा वापरही पूर्वीपेक्षा वाढत असून, घरी राहत असल्याने हट्टामुळे ते सहज मिळत आहे.

वजन कमी करण्यासाठी अशी घ्या काळजी

मुलांचे वजन कमी करण्यासाठी त्यांना घरातील लहान-सहान कामे सांगून त्यात गुंतवून ठेवले पाहिजे. घरातल्या घरात खेळू दिले पाहिजे.

आता मैदाने खुली झाली असल्याने पालकांनी त्यांना सुरिक्षतता बाळगून खेळायला नेले पाहिजे. व्यायाम, प्राणायाम करायला शिकविले पाहिजे.

टीव्ही व माेबाईल हे वजन वाढण्यास सर्वांधिक कारणीभूत असून, यासाठी ठरावीक अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मुलांना मिळणार नाही, याची पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

मुले टीव्ही, माेबाईल साेडतच नाहीत!

ऑनलाइनसाठी मोबाईल हातात मिळतोच, त्यानंतर गेम खेळतात. ते झाले की टीव्ही बघतात. बाहेर खेळायला जाणे अवघड झाल्याने मुलांचे वजन वाढण्याची समस्या जाणवत आहे.

मुलांना ऑनलाइन शिक्षणामुळे माेबाईलपासून दूर ठेवता येत नाही. कोरोनामुळे बाहेर पाठवता येत नसल्याने टीव्हीला चिटकून बसत आहेत. आता शाळा सुरू झाल्या तरच मुलांच्या मोबाईल, टीव्ही पाहणे सुटणार आहे.

लहान मुलांचे डाॅक्टर म्हणतात...

टीव्हीसमोर बसून जेवू दिले तर मुलांना जेवणाचे भानच राहत नाही. त्यामुळे हे टाळले पाहिजे. घरची लहानसहान कामे व व्यायामाद्वारे त्यांच्यातील लठ्ठपणा टाळणे गरजेचे आहे. - डॉ. याेगिता शेजाेळ, बालरोगतज्ज्ञ

टीव्ही व मोबाईलपासून मुलांना दूर ठेवून पालकांनी त्यांच्यासोबत इनडोअर गेम खेळले पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून मुलांचे असे बौद्धिक व शारीरिक खेळ घेतले तर ही समस्या राहणार नाही. त्यांना वेळही देता येईल.

डॉ. मनीष धारतकर, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Corona makes kids 'fat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.