कोरोना, मोबाइल वेडाने उडवली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:26+5:302021-06-28T04:23:26+5:30
या निद्रानाशामुळे आता आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडेही अनेकांच्या चकरा वाढल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. कोरोनामुळे वर्क ...
या निद्रानाशामुळे आता आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडेही अनेकांच्या चकरा वाढल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यामुळे संगणकावर ऑनलाइन राहण्याचे टायमिंग वाढले आहे. मोबाइल तथा इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून निघणाऱ्या ब्लू लाइटमुळे शरीरात निर्माण होणारे मेलाटोनिनचे प्रमाण कमी होते व त्यातून निद्रानाशाची समस्या निर्माण होते. झोप येण्यासाठी हे मेलाटोनिन निर्माण होणे आवश्यक असते. थोडक्यात कोरोनामुळे जीवनशैलीत अधिकच बदल झाला आहे. एकंदरीत या सर्व बाबींचा परिणाम म्हणून झोपेची समस्या निर्माण झाली आहे. झोप कमी झाल्यास प्रतिकारशक्तीही कमी होते. हे प्रमाण अधिक वाढले तर गुंतागुंतीच्या शारीरिक व्याधीही जडू शकतात. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहे. साधारणत: ६ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे.
-झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम-
एकाग्रता घटते. थकवा जाणवतो. मानसिक आजार उद्भवू शकतात. नैराश्य येते. भूक कमी होऊन रोगप्रतिकार शक्तीही घटते.
मानसिक
--मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून दूर ठेवा--
मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. त्यासाठी मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक आहे. पुरेशी झोप न झाल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, असे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
--झोप का उडते--
विविध कारणांनी झोप उडते. आर्थिक चिंता, मानसिक ताण, नैराश्य या कारणांमुळे झोप उडते. मोठ्यांपासून छोट्यांचा कोरोनाकाळात स्क्रीनिंग टाइम वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाइट डोळ्यांवर पडल्यानंतर झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन शरीरात निर्माण होत नाही व त्यातून झोपेची समस्या निर्माण होते. गोंगाटाची जागा किंवा खोलीमधील लख्ख प्रकाश हीपण त्याची कारणे आहेत.
--नेमकी झोप किती हवी?--
नवजात बाळ : १६ ते १८ तास
एक ते पाच वर्षे : १२ ते १४ तास
शाळेत जाणारी मुले : ८ ते १० तास
२१ ते ४० : ६ ते ८ तास
४१ ते ६० : ६ ते ८ तास
६१ पेक्षा जास्त : ५ ते ६ तास
--डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको--
अनेकदा झोप येत नाही म्हणून काही नागरिक झोपेची गोळी घेतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेऊ नये. यासोबतच झोपेची समस्या असले तर दिवसभरात उत्तेजक पदार्थ खाण्याचे पिण्याचे टाळावे. दुपारची झोपही टाळावी.
---
इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाइटमुळे मेलाटोनिनचे प्रमाण कमी होते. झोपेसाठी शरीरात हे रसायन निर्माण होणे आवश्यक आहे. प्रकाशामुळे ते निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते व झोप लागली तरी तिचा कालावधी व गुणवत्ता कमी होते. त्यामुळे झोपेच्या दोन तास अगोदर इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर टाळावा. बेडवरही झोपून ते हाताळू नयेत.
(डॉ. विश्वास खर्चे, मानसोपचार तज्ज्ञ)
--आरोग्यदायी झोपेचे तंत्र--
झोपण्याची व उठण्याची वेळ निश्चित असावी.
झोपण्याच्या दोन तास अगोदरच इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर टाळावा.
सकाळी हलका व्यायाम करावा. योग्य प्रमाणात व सकस आहार घेणे.
झोपण्याच्या आधी रिलॅक्सेशन करावे. दीर्घ श्वसन करणे, मन शांत हाईल असे संगीत ऐकावे.
बेडचा वापर फक्त झोपण्यासाठीच करावा. त्यावर बसून इतर कामे टाळावीत.
गरजेनुरूप मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा