दस्त नोंदणीकरिता कोरोना निगेटिव्ह अहवाल अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:32+5:302021-04-11T04:34:32+5:30
सहजिल्हा निबंधक वर्ग एक बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता व इतर कार्यालयीन ...
सहजिल्हा निबंधक वर्ग एक बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता व इतर कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता व इतर कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या पक्षकार यांच्याकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील, अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई आहे. या निर्णयाची कार्यवाही १२ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड १९ चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग दोन बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.