कोरोना : एकाचा मृत्यू, २१ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:08+5:302021-01-09T04:29:08+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा येथील एक, पळसखेड चक्का एक, खामगाव सहा, हिवरा एक, सुटाळा खुर्द एक, मांडका एक, बुलडाणा ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा येथील एक, पळसखेड चक्का एक, खामगाव सहा, हिवरा एक, सुटाळा खुर्द एक, मांडका एक, बुलडाणा एक, कोलारा एक, चंदनपूर एक, काठोडा एक, चिखली चार, लोणार एक, वसाडीमधील एकाचा यात समावेश आहे. मेहकर तालुक्यातील कल्याण येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांतील हा पाचवा मृत्यू आहे. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या १५७ झाली आहे.
दुसरीकडे ३५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधील ११, जळगाव जामोद येथील दोन, लोणार एक, शेगाव नऊ, बुलडाणा सात, मोताला एक, सिंखेड राजा तीन आणि खामगावातील दोन जणांचा समावेश आहे.
९३,१४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या अहवालापैकी ९३ हजार १४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, १२ हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, ७३० संदिग्धांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ८६४ असून, सक्रिय रुग्णांची संख्या ३२५ आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.