कोरोना: मोताळ्यातील एकाचा मृत्यू, बाधीतांची संख्या ११०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:57+5:302021-02-15T04:30:57+5:30
पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये चिखली २७, हातनी दोन, कोलारा एक, अंत्रीकोळी एक, अमडापूर तीन, अंचरवाडी दोन, खंडाळा दोन, भोकरवाडी एक, जांभोरा ...
पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये चिखली २७, हातनी दोन, कोलारा एक, अंत्रीकोळी एक, अमडापूर तीन, अंचरवाडी दोन, खंडाळा दोन, भोकरवाडी एक, जांभोरा एक, पाटोदा एक, भालगाव दोन, देऊळगाव राजा नऊ, सिनगाव जहागीर दोन, डोढ्रा एक, गिरोली बुद्रूक एक, साखरखेर्डा तीन, सिंदखेड राजा एक, अंजनी खुर्द एक, अजीसपूर एक, बुलडाणा २४, वाडी एक, खामगाव दहा, मलकापूर एक, मोरखेड एक, लासुरा एक, मुर्ती एक, लाखनवाडा सुटाळा दोन, सुटाळा एक, हिवरखेड खू एक, नांदुरा दोन, पिंप्री अढाव एक, आणि जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील धावडा येथील एक तथा जळगाव जिल्ह्यातील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, मोताळा येथील ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ४६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोवडी केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव येथून दोन, चिखली येथून पाच, बुलडामा १३, लोणार एक, शेगाव पाच, नांदुरा एक, सिंदखेड राजाोक, मलकापूर पाच, जळगाव जामोद येथील एकाला सुटी देण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी १ लाख १५ हजार २१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनावर मात केलेल्या १४ हजार ११५ जणांना रुग्णालयातून आतापर्यंत सुटी देण्यात आली आहे.
८८७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या ८८७ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १४, ८१५ झाली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ५२३ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १७७ जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.