कोरोना: मोताळ्यात एकाचा मृत्यू; ९१ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:22+5:302021-02-14T04:32:22+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १४, चांधई एक, सवणा दोन, बोरगाव एक, धानोरी एक, देऊळगाव राजा एक, पिंपळखुटा दोन, मलकापूर ...
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १४, चांधई एक, सवणा दोन, बोरगाव एक, धानोरी एक, देऊळगाव राजा एक, पिंपळखुटा दोन, मलकापूर पांग्रा एक, अंजनी एक, लोणार पाच, येळगाव एक, डोंगर खंडाळा एक, धामणगाव एक, टाकळी एक, भादोला एक, बुलडाणा २३, जळगाव जामोद एक, वाडी चार, सुनगाव एक, खामगाव चार, मलकापूर नऊ, दाताळा एक, घिर्णी एक, हरसोडा एक, शेगाव सहा, जवळपा तीन, तळणी एक, सोनाळा एक आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हत्ता येथील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे मोताळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसात दोन कोरोनाबाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे तर बुलडाणा व चिखलीमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे शनिवारी ५७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव कोविड केअर सेंटरमधून १२, चिखली पाच, देऊळगाव राजा आठ, बुलडाणा १७, लोणार पाच, शेगाव चार, नांदुरा तीन, सिंदखेड राजा दोन आणि मलकापूर येथील एकाचा यात समावेश आहे.
तपासणी करण्यात आलेल्यांपैकी आजपर्यंत १ लाख १४ हजार ९११ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोबतच बाधितांपैकी १४०६९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. सध्या तपासणी करण्यात आलेल्यंापैकी ८३१ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४ हजार ७०५ झाली आहे. त्यापैकी सध्या प्रत्यक्षात ४६० सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १७६ जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.