कोरोना : चिखलीत एकाचा मृत्यू, ५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:46+5:302021-01-08T05:51:46+5:30

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२१ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. ...

Corona: One dies in mud, 54 positive | कोरोना : चिखलीत एकाचा मृत्यू, ५४ पॉझिटिव्ह

कोरोना : चिखलीत एकाचा मृत्यू, ५४ पॉझिटिव्ह

Next

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२१ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान चिखली येथील एका ७० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील संख्या आता १५३ झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जळका तेली येथील एक, पिंपळगाव राजा येथील एक, सुटाळा येथील दोन, बोरी अडगाव एक, निमगाव एक, खामगाव सात, देऊळगाव राजा चार, वाघोरा एक, नायगाव एक, वाघापूर एक, चिखली १३, पळसखेड चक्का एक, लोणार दोन, भुमराळा एक, मोताळा एक, खरबडी दोन, पिंपळगाव देवी एक, बुलडाणा शहर सहा, मेहकर दोन, जानेफळ एक, जळगाव जामोद तीन जणांचा समावेश आहे. दरम्यान चिखली येथील एका ७० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये खामगाव कोविड सेंटरमधून तीन, बुलडाणा पाच, सिंदखेड राजा येथील एकाचा यात समावेश आहे.

९२,०५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह

आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ९२ हजार ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर १२ हजार २६० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ६७२ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १२ हजार ७७९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३६६ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे असून १५३ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona: One dies in mud, 54 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.