अमडापूरसह परिसरात वाढताहेत कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:59+5:302021-02-16T04:34:59+5:30
सध्या कोरोना विषाणू आजार संपलेला नसताना नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. विनामास्क फिरत आहेत. परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ...
सध्या कोरोना विषाणू आजार संपलेला नसताना नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. विनामास्क फिरत आहेत. परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते.
कोरोना कायम असून नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या करिता किमान नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधणे गरजेचे आहे. आता लग्न सोहळे या सारखे कार्यक्रम सुरू झालेले असून, प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये कोणीही तोंडावर रुमाल किंवा मास्क लावत नाहीत. यामुळे कोरोना सारखा आजाराचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूरच्या वतीने करण्यात आले आहे.