कोरोना रुग्णांवर नियंत्रण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:06+5:302021-04-06T04:33:06+5:30
मोताळा : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आणि गृहविलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण बाहेर ...
मोताळा : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आणि गृहविलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे दिसून येते.
----
हायमास्टची ई-निविदा मॅनेज
बुलडाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतीमध्ये हायमास्ट लाइटबाबतची ई-निविदा मॅनेज करण्यात आली. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिका-यांकडे तक्रार नोंदविली आहे.
-------
अधिका-यावर शिस्तभंगाचे आदेश
बुलडाणा : तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश विभागीय उपायुक्तांनी जिल्हाधिका-यांना दिले. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील अधिका-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
----
परीक्षेच्या वेळात बदल करण्याची मागणी
बुलडाणा : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून सुरू होत आहेत. या परीक्षा कडक उन्हाळ्यात घेतल्या जात असल्याने परीक्षेच्या वेळात बदल करण्याची मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे.
---
सर्क्युलर रोडचे काम पूर्ण करा
बुलडाणा : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सर्क्युलर रोडचे काम गत काही दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
-----------
कोरोना लसीकरणाला प्रतिसाद
मोताळा : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाला ग्रामीण भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात आहे.
---
प्रसूती कक्षाचे नूतनीकरण
बुलडाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश गवई, सत्तार कुरेशी यांच्या मार्गदर्शनात हे काम मार्गी लावण्यात आले.
---
शासकीय कार्यालयांत गुटख्याच्या पिचका-या
बुलडाणा : येथील शासकीय कार्यालयांतील विविध विभागांचे कोपरे गुटख्याच्या पिचका-यांनी रंगविले आहेत. शासकीय कर्मचारी आणि कामासाठी येथे येत असलेले नागरिक गुटखा खाऊन भिंतींवर थुंकत आहेत.
---
पथदिवे दिवसाही सुरूच
मोताळा : येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे चक्क दिवसाही सुरू राहत आहेत. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मुख्याधिकारी रजेवर असल्याचा गैरफायदा काही कर्मचारी घेत आहेत.
---
कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा
बुलडाणा : जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता उद्रेक आहे. आरोग्य विभागाकडून कोरोनाबाबत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच प्रियंका निलेश चिम यांनी केले आहे.
--------------