जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह; दोघांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:53+5:302021-08-21T04:39:53+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण एक हजार ३० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण एक हजार ३० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी एक हजार २९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण देऊळगाव राजा तालुक्यातील डोंगर सोयगाव येथील आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड अँटिजन टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७३७, तर रॅपिड टेस्टमधील २९२ अहवालांचा समावेश आहे. दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत सहा लाख ७४ हजार ५१७ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत ८६ हजार ६६४ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
२८ सक्रिय रुग्ण
आज रोजी एक हजार ४६८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल सहा लाख ७४ हजार ५१७ आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे २८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.