कोरोना वाटत फिरणारे गृहविलगीकरणातील बेजबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:43+5:302021-03-29T04:20:43+5:30

बुलडाणा : गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता उद्रेक कायम असतानाच, गृहविलगीकरणातील ...

Corona seems to be irresponsible in wandering home separation! | कोरोना वाटत फिरणारे गृहविलगीकरणातील बेजबाबदार!

कोरोना वाटत फिरणारे गृहविलगीकरणातील बेजबाबदार!

Next

बुलडाणा : गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता उद्रेक कायम असतानाच, गृहविलगीकरणातील बेफिकीर कोरोना रुग्ण प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. त्याचवेळी सामान्यांसाठी कोरोनावाहक बनत असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये दिसून येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, मलकापूर, शेगाव ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट केंद्र म्हणून समोर येत आहेत. खामगाव शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत असतानाच, आरोग्य प्रशासनाकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे समोर येत आहे. त्याचेळी गृहविलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांवर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अहवाल विलंबाने येत असल्याने अनेक काेरोना पॉझिटिव्ह रुग्ण स्वत:हून विविध ठिकाणी चाचण्यांसाठी फिरत आहेत तर गृहविलगीकरणात ठेवलेले रुग्ण काहीच झाले नसल्याच्या आवेशात बाहेर फिरत आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील विविध शहरांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. नियंत्रण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नियोजनात कमी पडत असल्याने, कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे दिसून येते.

चौकट...

स्वॅब दिल्यानंतर तिघांसोबत घेतला चहा!

- गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाने जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी स्वॅब दिला. जिल्हा सामान्य रुग्णालयात जाताना एका कार्यालयातील दोन कर्मचारी या रुग्णासोबतच होते. स्वॅब दिल्यानंतर नगरपालिका परिसरातील एका चहाच्या टपरीवर या रुग्णाने अन्य दोघांसोबत चहा घेतला. आपण स्वॅब देण्यासाठी नेलेला सहकारी पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित दोघांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चौकट...

गृहविलगीकरणातील रुग्णांकडून बाजारात खरेदी!

- कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बुलडाणा येथील एका रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, सदर रुग्णाकडून परिसरातील नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. शुक्रवारी या रुग्णाने बाजारात भाजीपाला तसेच किराणा साहित्याची खरेदीही केली.

चौकट...

या बेजबाबदारांना कोण आवरणार ?

-गृहविलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्णांकडून कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून अशा रुग्णांकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.

- खामगाव येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला तब्बल ९ दिवसांपर्यंत अहवालाबाबत माहिती दिली गेली नाही. आरोग्य प्रशासनाच्या गलथानपणामुळे संबंधित रुग्ण समाजात बिनधास्त वावरत होता.

- कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण शहरातील उच्च वस्तीतील परिसरात मॉर्निंग वॉक करत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे लपविण्यासाठी संबंधित रुग्णाकडून मुद्दामहून मॉर्निंग वॉक आणि इतर गोष्टी केल्या जात असल्याची चर्चा आहे.

चौकट...

कोरोनाचे एकूण रुग्ण

-----

बरे झालेले रुग्ण

-----

उपचार सुरू असलेले रुग्ण

----

गृहविलगीकरणात असलेले रुग्ण

----

फोटो:

--------

Web Title: Corona seems to be irresponsible in wandering home separation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.