केंद्रीय आरोग्य पथकाद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:20+5:302021-04-13T04:32:20+5:30
या पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा व भूलतज्ज्ञ डॉ. दृष्टी दास ...
या पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा व भूलतज्ज्ञ डॉ. दृष्टी दास यांनी सुलतानपूर येथील कन्टेन्मेंट झोनची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी सुद्धा या पथकातील सदस्यांनी संवाद साधला. तद्नंतर लोणार येथील बसस्टँडवर लोणार कोविड सेंटरच्या मोबाइल टीमद्वारे आयोजित कोविड तपासणी शिबिराला या पथकाने भेट दिली. त्यानंतर या पथकाने लोणीरोड वरील तालुक्यातील एकमेव असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देउन तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. या सेंटरवर कार्यरत डॉ. सोनाली खोडके व डॉ. अतुल सिरसाट यांच्याकडून कोविड केंद्रात केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीची व कोरोना तपासणी अहवालाची माहिती घेतली. येथील स्वच्छता व रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाविषयी भरती असलेल्या रुग्णांकडून माहिती घेतली. सर्व रुग्णांनी उत्तम सुविधा मिळत असल्याचे सांगितले. लसीकरण व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पथकाने ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेत उपस्थित अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. तालुक्यात तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर सैपन नदाफ यांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. फिरोज शाह, डॉ. जायभाये, डॉ. मंगेश सानप हे अधिकारी तसेच कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरकटे, डॉ. सिरसाट, डॉ. खोडके, डॉ. नागरे, डॉ. अग्रवाल यांच्या कामाची सकारात्मक दखल घेतली व समाधान व्यक्त केले.