वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या झाल्या कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:30+5:302021-03-07T04:31:30+5:30

दुसरीकडे जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी २०,९२५ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी १८ हजार ९७ ...

Corona tests performed on 1 lakh 80 thousand citizens during the year | वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या झाल्या कोरोना चाचण्या

वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या झाल्या कोरोना चाचण्या

Next

दुसरीकडे जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी २०,९२५ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी १८ हजार ९७ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयामध्ये २,६३० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ०.९४ टक्के आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा कमी आहे. यापूर्वी तो साधारणत: १.२० ते १.३० टक्क्यांच्या आसपास राहत होता. मात्र अलीकडील काळात तो कमी झाला आहे.

- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर -

जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता तब्बल १० टक्क्यांनी घसरले असून, सध्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा ११.६१ टक्के आहे.

- अशा झाल्या चाचण्या -

आरटीपीसीआर - १,२४,६४३ (६९.१५ टक्के)

ट्रुनॅट - ८,८१२ (४.८८ टक्के)

रॅपिड टेस्ट - ४९,७६९ (२७.६१ टक्के)

Web Title: Corona tests performed on 1 lakh 80 thousand citizens during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.