विनामास्क फिरणाऱ्यांच्या केल्या कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:48+5:302021-03-29T04:20:48+5:30
सध्या बीबी येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात ...
सध्या बीबी येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. तरीसुध्दा काही नागरिक विनामास्क गावात फिरत असल्याने रस्त्यावर गर्दी दिसत होती. त्यामुळे आरोग्य विभागाने विनामास्क तथा विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि या टेस्ट केल्या. ५१ चाचण्यांत ६ जण कोरोनाबाधित आढळल्याने बीबी येथे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकांनी कोरोनासंदर्भात आवश्यक नियमावलीचे पालन करणे आवश्यक असून कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी केले आहे. या कोरोना चाचणी शिबिरात वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोजशाह, कोविड केंद्राचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुराणा, डॉ. नाईक, डॉ. अनिता नागरे, गजानन कावरखे तथा ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल विभाग यांनी परिश्रम घेतले. तर ठाणेदार तावरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.