कोरोना : दोघांचा मृत्यू , १,०६० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:34+5:302021-05-14T04:34:34+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १५६, खामगाव तालुक्यातील ११४, शेगाव तालुक्यातील ३१, देऊळगाव राजा मधील ८१, चिखली मधील १८०, ...
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १५६, खामगाव तालुक्यातील ११४, शेगाव तालुक्यातील ३१, देऊळगाव राजा मधील ८१, चिखली मधील १८०, मेहकर ७८, मलकापूर ४६, नांदुरा १३५, लोणार २३, मोताळा ४४, जळगाव जामोद ४७, सिंदखेड राजा ७९ आणि संग्रामपूर तालुक्यातील ४६ जणांचा समावेश आहे. दुसरीकडे शेगाव येथील खिडकी वेस परिसरातील ९१ वर्षीय महिला आणि मलकापूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे गुरूवारी मृत्यू झाला. दरम्यान ७२१ जणांनी गुरूवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
--४,०२,१२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह--
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख २ हजार १२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासोबतच ६९ हजार ३४७ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही २,५३५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ७४ हजार ९३८ झाली आहे. यापैकी ५,०८८ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे ४९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.