कोरोना : बुलडाणा जिल्ह्यात दोन मृत्यूची लपवाछपवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:40 AM2020-06-19T10:40:43+5:302020-06-19T10:40:49+5:30

दोन मृत्युची माहिती लपविण्यात आली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Corona: Two deaths concealed in Buldana district? | कोरोना : बुलडाणा जिल्ह्यात दोन मृत्यूची लपवाछपवी?

कोरोना : बुलडाणा जिल्ह्यात दोन मृत्यूची लपवाछपवी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सातत्याने वाढत असतानाच दर दिवशी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे तर १३ दिवसा आड एकाचा मृत्यू होत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे लपविल्या जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सरकारचा हवाला देत बुधवारी ेक टिष्ट्वट केले. त्यानुसार
दोन मृत्युची माहिती लपविण्यात आली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाने आरोग्य यंत्रणा अडणीत आली होती. दरम्यान, शासनानेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची सुधारीत यादी प्रसिद्ध केल्यावर त्यामध्ये वाढलेल्या मृतकांचा आकडा हा लपविलेला होता असा दावा करती फणवीस यांनी पुन्हा नवीन आकडेवारी टिष्ट्वट केल्याने सध्या आकड्यांचा खेळ रंगला आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील प्रत्येक प्रत्येक मृत्युची समीक्षा करण्यासाठी डेथ आॅडीट समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला जिल्हास्तरावर रुग्णांच्या मृत्युचे आॅडीट सात दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर शोध घेणे, मृत्युच्या तत्कालीन कारण कोवीड १९- नसल्यास तसे नमूद करणे आवश्यक आहे, अशा रुग्णंचा कोवीडमुळे झाल्याचे गृहीत धरण्यात येणार नसल्याचे म्हंटले आहे. तमुळे प्रशासननाने फेर तपासणीच्या नावाखाली आकड्यांमध्ये बदल केल्याचा आरोपही त्यांनी टिष्ट्वटच्या माध्यमातून केला.
राज्य सरकारचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये बुलडामा जिल्ह्यातील दोन मृत्यू लपविण्यात आल्याचे सांगितले आहे. यामुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे.
प्रकरणी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना विचारणा केली असता बुलडाण्यातील तीन मृत्यूंची डेथ समरी ही अगोदर सादर करण्यात आली होती. सोबतच ११ आणि १४ जून रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणांची एकंदरीत समरी दाखल होण्यास विलंब लागला. साधारणत: १५ दिवसाच्या आत ही समरी सादर करावी लागते. मलकापूरमधील ११ व १४ जून रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणांची समरी ही १७ जून रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूच्या संख्येत त्यांचा समावेश होईल. कधी कधी एखादा मृतक हा बुलडाणा जिल्ह्यातील असला तरी तो अन्य जिल्ह्यात दगावलेला असतो. प्रशासकीय पातळीवर त्याबाबत अधिकृत माहिती मिळण्यास विलंब होतो व त्यामुळे संख्यात्मक फरक प्रसंगी पडतो. डिटेल इन्फॉर्मेशन मिळण्यास विलंब झाल्यामुळेही असे प्रकार घडतात, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, १७ जून रोजीही रोहीणखेड येथील एकाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
जिल्ह्यातून जून महिन्यात चार दिवसांच्या अंतराने मलकापूरमधील दोन व्यक्तींचा कोरोना संसर्गाने मृत्यू झालेला आहे तर रोहीणखेड येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा १७ जून रोजी मृत्यू झाला आहे. यापूर्वी जळगाव जामोद, खामगाव आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आता सहा झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा आता दीडशेच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे.


जिल्हत सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. १७ जून रोजी एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ११ आणि १४ जून रोजीच्या मृत्युची समरी १७ जून रोजी सबमीट करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्येत त्याची नोंद होईल. मृत्यू समरी सादर करण्यास १५ दिवस लागतात. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत थेट डेथ रिपोर्ट सहा झालेले आहेत.
- सुमन चंद्रा
जिल्हाधिकारी, बुलडाणा

Web Title: Corona: Two deaths concealed in Buldana district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.