सुलतानपुर प्राथमिक आरोग्य केद्रांत कोरोना लसीकरण बाराशे पार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:46+5:302021-02-24T04:35:46+5:30
कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. लोणार तालुक्यातील एकमेव कोरोना लसीकरण केंद्र असलेल्या सुलतानपूर प्राथमिक ...
कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. लोणार तालुक्यातील एकमेव कोरोना लसीकरण केंद्र असलेल्या सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत बाराशेपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रल्हाद जायभाये यांनी दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापर करणे, वारंवार हात धुणे, गर्दी जाणे टाळणे, आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केल्यास कोरोनाला आळा बसू शकतो असे मत डॉ. जायभाये यांनी व्यक्त केले. सुलतानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात २२ फेब्रुवारीला लोणार पंचायत समितीच्या गटाविकास अधिकारी अस्मिता तांबे, सहा. गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्राम विकास अधिकारी गजानन कावरखे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यावेळी लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फेरोज शाह, पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.