ग्रामसेवकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:35 AM2021-03-26T04:35:01+5:302021-03-26T04:35:01+5:30
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने विविध नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ही अंमलबजावणी ग्रामीण भागात गावपातळीवर राबविणे गरजेचे ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने विविध नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ही अंमलबजावणी ग्रामीण भागात गावपातळीवर राबविणे गरजेचे असल्याने याकरिता गावपातळीवरील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यासोबतच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी प्रशासनाचे प्रत्येक नियम काटेकोरपणे राबवित असताना त्यांनाही कोरोना होण्याची भीती वाटत होती. फ्रंटलाईनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक व महसूलच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण हे लवकर करण्यात आले. मात्र ग्रामसेवक व कृषी विभागातील कर्मचारी यांच्याकडे लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणेने लक्ष दिले नव्हते. ही बाब लक्षात आल्याने ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सतीश निकम व सचिव सुरेश मवाळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनाही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान, आरोग्य विभागाने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.