Corona Vaccine : लसीसाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी, उपलब्धता मात्र कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:04 AM2021-05-03T11:04:33+5:302021-05-03T11:04:42+5:30
Corona Vaccine in Buldhana : चौथ्या टप्प्यात जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. मात्र बुलडाणा, मेहकरसह अन्य काही ठिकाणी लसीसाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान महाराष्ट्र दिनी तर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. या चौथ्या टप्प्यात जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे.
बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जवळपास एक हजार नागरिकांनी लसीसाठी गर्दी केली होती. मात्र उपल्बधता मात्र अवघी १८० डोसची होती. त्यामुळे येथे गोंधळ उडाला आणि नागरिकानी प्रशासनावर संताप व्यक्त केला. अशीच काहीशी स्थिती मेहकर येथेही बघण्यास मिळाली होती. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या तीन टप्प्यातील लसीकरण मोहिमेत आजपर्यंत दिलेल्या एकूण उदिष्ठाच्या २४ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कस आणि ४५ वर्षावरील नागरिक असे मिळून ९ लाख २६ हजार ९२७ जणांचे लसीकरण जिल्ह्यात करावयाचे होते. त्यापैकी २ लाख २३ हजार ५४४ जणांचे ३० एप्रिल पर्यंत लसीकरण झाले