तीन हजारांवर नागरिकांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:04+5:302021-03-13T05:02:04+5:30
प्रत्येकाने लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य मित्र तथा रुग्ण कल्याण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लसीकरणापूर्वी आधार कार्ड ...
प्रत्येकाने लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य मित्र तथा रुग्ण कल्याण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लसीकरणापूर्वी आधार कार्ड स्वतःचा मोबाइल तसेच दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन यावी मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करावे, तसेच अंतिम व्यक्तीला लस मिळेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
कोविड लसीकरणाविषयी सूचनामध्ये १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लस ही पूर्णतः सुरक्षित असून, गरोदर माता व स्तनदा माता यांनी लस घेऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे.
लसीकरणापूर्वी सद्यःस्थितीत आपण कोणती औषध घेत आहोत याचीही माहिती लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांना सांगणे आवश्यक आहे.
राज्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना लसीकरण करून घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. सर्वत्र १६ जानेवारीला पहिला डोस देण्यास सुरुवात झाली होती, तर राज्यात आता लसीकरणाचा दुसरा डोस सुरू करण्यात आला आहे. चार आठवड्यांच्या टप्प्यात दोन वेळा लसी घ्यावयाच्या असून त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होणार आहेत. कोविड-१९ विषाणूपासून सुरक्षा मिळण्यासाठी मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करावे, असे आवाहन सागर कडभने यांनी केले आहे.
कशी करावी नोंदणी?
ओरोग्य सेतू ऍप किंवा ऑनलाइन संकेतस्थळावर वर लॉग इन करा. एका मोबाइलवरून चार जणांची नोंदणी करता येऊ शकते, आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा, आपले खाते तयार करण्यासाठी ओटीपी मिळवा, आपले नाव, वय, लिंग आदी भरणे आणि ओळख दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे. ४५ वर्षांवरील लोकांनी दुर्धर आजार असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अपलोड करून तारीख व ठिकाण निवडणे आवश्यक आहे. तसेच जेष्ठ नागरिक सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करू शकतात.