CoronaVirus in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२९ कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 01:06 PM2020-10-30T13:06:38+5:302020-10-30T13:07:00+5:30

१२९ जण तपासणीत कोराना बाधीत आढळून आले तर तीन जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला.

Corona Virus in Buldhana: Three died, 129 infected with corona | CoronaVirus in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२९ कोरोनाबाधीत

CoronaVirus in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२९ कोरोनाबाधीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा:  गेले चार ते पाच दिवस कोरोना बाधीत रुग्ण तुलनेने कमी आढळून येत असताना गुरूवारी पुन्हा १२९ जण तपासणीत कोराना बाधीत आढळून आले तर तीन जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या १२५ झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्यांपैकी १,३६४ जणांचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १,२३५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. दुसरीकडे उपचारादरम्यान खामगाव येथील कोवीड रुग्णालयामध्ये जळगाव जामोदमधील ८३ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा कोवीड रुग्णालय मलकापूरमधील शास्त्रीनगरमधील ८२ वर्षीय महिला तर सव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान, गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जळगांव जामोद येथील चार, खेर्डा येथील एक, वाडी खुर्द येथील एक, खामगाव सहा, घाटपुरी एक, निमकवळा सहा, वझर नऊ, झोडगा तीन, शिरला चार, पिंप्री देशमुख पाच, बुलडाणा १२, चौथा एक, चांडोळ एक, पळसखेड दहा, सुलतानपूर दोन, वझर आघाव एक, जांभूळ एक, लोणार १३, मेहकर दोन, धानोरा एक, लोणी काळे एक, देऊळगाव साकर्शा एक, लोणी गवळी दोन, देऊळगाव माळी दोन, गोहेगाव तीन, हिवरा आश्रम एक, दादुल गव्हाण पाच, रायपूर एक, मुरादपूर एक, शेलसूर एक, चिखली सहा, सिंदखेड चार, मलकापूर एक, वाकोडी एक, भोटा दोन, देऊळगाव राजा सहा, सिनगाव जहाँगीर एक, सावखेड एक, असोला एक आणि जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील चार व्यक्ती या प्रमाणे १२९ जण कोरोना बाधीत आढळून आले. 
दरम्यान, ७८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

Web Title: Corona Virus in Buldhana: Three died, 129 infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.