कोरोनाला रोखले गावाच्या वेशीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:51+5:302021-07-18T04:24:51+5:30
ग्रामस्थांना मास्कची ॲलर्जी! दुसरबीड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाविषयी नागरिकांमध्ये गांभीर्यच नसल्याचे चित्र दुसरबीड ...
ग्रामस्थांना मास्कची ॲलर्जी!
दुसरबीड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाविषयी नागरिकांमध्ये गांभीर्यच नसल्याचे चित्र दुसरबीड येथे दिसून येते. येथील बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. दरम्यान, पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे़
सर्पमित्राने दिले नागाला जीवदान
धामणगाव धाडः येथील शेतकरी गणेश श्यामराव पायघन यांच्या शेतातील विहिरीत आढळलेल्या नागाला सर्पमित्र नीलेश गुजर यांनी १७ जुलै राेजी जीवनदान दिले. विहिरीत असलेल्या नागाला गुजर यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले व जंगलात साेडून दिले. गुजर यांनी परिसरात आतापर्यंत अनेक सापांना जीवनदान दिले आहे.
वेळेत बदल, व्यापाऱ्यांची चिंता
बुलडाणा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता, २८ जूनपासून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत खुली राहणार असल्याचे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
लसीकरणाला प्राधान्य द्या
सिंदखेड राजा: तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गावागावात शिबिरही घेण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाली. त्यामुळे लसीकरणाला प्राधान्य द्या, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा
किनगाव राजा: परिसरातील अनेक पाणंद रस्त्यांना आमदार निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे; परंतु मंजुरी मिळूनही अद्याप या रस्त्याच्या कामांना सुरुवात झालेली नाही. पावसाळा सुरू झाला तरी शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा आहे.
जि.प. शाळांमधील वर्गखोल्यांची दुरवस्था
अमडापूर : चिखली तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती. परिसरातील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळाला नाही. त्यामुळे वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.