कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:38+5:302021-05-16T04:33:38+5:30
शाळेत गेलीच नाहीत. मध्यंतरी ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होतेे; मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला ...
शाळेत गेलीच नाहीत. मध्यंतरी ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होतेे; मात्र त्याला फारसा प्रतिसाद
मिळाला नाही व त्याचदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या, त्या आजतागायत कायम आहेत. आता तर दहावीच्या परीक्षाही रद्द झाल्या असून, पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांची वरच्या वर्गात ढकलगाडी सुरू केली आहे. त्यामुळे जोपर्यंत लहान मुलांचे लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत तरी शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत, हे स्पष्टच आहे.
४२ हजार ११ विद्यार्थी थेट दुसरीत
कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या असूत, गेल्यावर्षी पहिल्या वर्गात दाखल झालेले विद्यार्थी दुसऱ्या वर्गात पोहोचले आहेत. या विद्यार्थ्यांनी वर्षभरात शाळा अनुभवलेलीच नाही. शाळा अंगवळणी पडण्याच्या
आतच दुसऱ्या वर्गात त्यांना प्रवेश मिळाला आहे.
इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी हे वरच्या वर्गात ढकलले गेले आहेत. त्यानुसार इयत्ता पहिलीचे ४२ हजार ११ विद्यार्थी थेट दुसरीत गेले आहेत.
आता तर दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणी पुढच्या वर्गात प्रवेश कसा राहील, यावर काथ्याकूट सुरू आहे.
शिक्षणाधिकारी म्हणतात...
२२ जूनला शाळा सुरू करण्याबाबत आदेश आहेत. लसीकरणाबाबतही सध्या तरी शिक्षण विभागाला कुठल्याही स्वरूपाच्या सूचना नाहीत. आता तर उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. मुलांचे आरोग्य हा प्राधान्याचा विषय असल्याने योग्यवेळी निर्णय होईलच.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक!
वर्ष झाले शाळेमध्ये गेलेलो नाही, ऑनलाईन क्लासमध्ये शिकविले जाते. मात्र शाळेतील शिक्षणाचा आनंद येत नाही.
आदित्य केंदळे, विद्यार्थी.
शाळा सुरू व्हाव्यात, असे सर्वच शिक्षकांना वाटते. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
लसीकरण झाले, तर शाळा सुरू होतीलही.
डॉ. ज्ञानेश्वर गाडे, शिक्षक.
मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय शाळेत पाठविण्यास कोणतेही पालक तयार होणार नाहीत. त्यामुळे लसीकरणाची व्यवस्था त्वरेने व्हावी.
आत्माराम दळवी, पालक.
ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही पर्याय
पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी कोरोनाची स्थिती कशी आहे, यावरच शाळांचे भवितव्य ठरणार आहे. ऑनलाईन-ऑफलाईन हे दोन्ही पर्याय पालकांसाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे. पाल्यांचे लसीकरण झाले तरच पालक मुलांना शाळेत पाठविण्याची शक्यता आहे.