कोरोना : मासरूळ येथील महिलेचा मृत्यू, ६२ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:27+5:302021-01-02T04:28:27+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव येथील सात, बुलडाणा १४, बिरसिंगपूर एक, शेंबा एक, शेलगाव मुकुंद चार, तराडखेड एक, रसूलपूर एक, खामगाव ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव येथील सात, बुलडाणा १४, बिरसिंगपूर एक, शेंबा एक, शेलगाव मुकुंद चार, तराडखेड एक, रसूलपूर एक, खामगाव १३, आवार एक, पारखेड एक, चिखली तीन, धोडप एक, देऊळगाव राजा दोन, सुनगाव दोन, जळगाव जामोद तीन, मेहकर एक, दुसरबीड एक, सावखेड तेजन दोन, मलकापूर येथील दोघांचा समावेश आहे. मासरूळ येथील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे शुक्रवारी एकूण ३७ जणांनी कोरोनावर मात केली, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. खामगाव कोविड सेंटरमधून सात, सिंदखेड राजा येथून एक, चिखली येथून तीन, बुलडाणा येथून पाच, शेगावमधून १२, मलकापूरमधून चार, नांदुरा येथून एक, लोणार येथून एक व देऊळगाव राजा कोविड सेंटरमधून तीन जणांचा यामध्ये समावेश आहे.
८९ हजार ८०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ हजार ८०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर कोरोनाबाधितांपैकी १२ हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. १ हजार ८०९ संदिग्धांच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ५८० झाली आहे. ५२१ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, तर १५२ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.