एकनाथ महाराज दिंडी सोहळ्याला कोरोनाचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:16+5:302021-04-02T04:36:16+5:30
साखरखेर्डा ०येथून जवळच असलेल्या गुंज येथील हभप माणिकराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गुंज ते पैठण दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ...
साखरखेर्डा ०येथून जवळच असलेल्या गुंज येथील हभप माणिकराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गुंज ते पैठण दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते . यावर्षी मात्र कोरोना संसर्गजन्य आजारामुळे दिंडी सोहळा रद्द करुन गावातूनच संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित केला आहे .
गुंज येथील मानिकराव ढवळे महाराज यांना वयाच्या १० व्या वर्षांपासून हरी भक्तीची ओढ लागली होती . दरवर्षी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या सोहळ्यात सोपान काका. दिंडीत मानाची पालखी म्हणून अग्रस्थानी असते . हभप माणिकराव ढवळे महाराज यांच्या नंतर आजही ती परंपरा त्यांची मुलगी हभप भागिरथी बाई नित्यनियमाने सांभाळीत आहे . हभप माणिकराव ढवळे महाराज यांच्या निधना नंतर भागिरथी बाई यांनी नाथशष्टी निमीत्त दरवर्षी पैठणला दिंडी सोहळ्याचे आयोजन करतात . मागील वर्षी सुध्दा आयोजन केले होते . परंतू कोरोना संसर्गजन्य आजार फैलावू नये म्हणून शासनाने यांत्रा महोत्सवावर बंदी घातली होती . त्यामुळे जालना येथील दत्त मंदिरातुन दिंडीला परत फिरावे लागले होते . यावर्षी सुध्दा कोरोना संक्रमण वाढल्याने दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे . गावातच नाथ महाराज आणि भानुदास महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित करुन जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती हभप भागीरथीबाई ढवळे यांनी लोकमतला माहिती दिली .
फोटो :--- नाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघत असलेला पालखी सोहळा .