कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:49+5:302021-06-25T04:24:49+5:30

बुलडाणा : दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच काेराेनाच्या ‘डेल्टा प्लस’ने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढविली आहे़ जिल्ह्यात ...

Corona's 'Delta Plus' raises concerns! | कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता!

कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता!

Next

बुलडाणा : दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच काेराेनाच्या ‘डेल्टा प्लस’ने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढविली आहे़ जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चा एकही रुग्ण आढळला नसला तरी आराेग्य विभागाने उपाययाेजना सुरू केल्या आहेत़

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमी हाेत असल्याचे चित्र आहे़ काेराेना रुग्णांच्या चढ-उताराने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढविलेली असतानाच आता ‘डेल्टा प्लस’चे संकट आले आहे़ राज्यभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आढळले आहेत़ यातील काही रुग्ण जळगाव जिल्ह्यातही आढळले आहे़ बुलडाणा जिल्ह्यातील अनेकजण जळगाव खान्देश जिल्ह्यात विविध कामांसाठी जातात़ त्यामुळे या जिल्ह्यातून ‘डेल्टा प्लस’चा शिरकाव हाेऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे़ दरराेज तीन हजारांच्या वर काेराेना चाचण्या करण्यात येत आहेत़ आराेग्य विभागाचा रॅपिड टेस्टवर जास्त भर आहे़ जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असून, दरराेज १०० पेक्षा कमीच रुग्ण आढळत आहेत़ जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट १़ ०७ टक्के आहे़

जिल्ह्यात रॅपीड चाचण्यावर भर

काेरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काेराेना चाचण्या सुरूच आहे़ दरराेज तीन हजारांच्यावर चाचण्या करण्यात येत आहेत़

गुरुवारी जिल्ह्यात ६६० आरटीपीसीआर, तर २६१७ रॅपीड टेस्ट करण्यात आल्या आहेत़ यापैकी ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़

जिल्ह्यात सर्वाधिक चाचण्या लाेणार तालुक्यात करण्यात आल्या आहेत़ यामध्ये १०२ आरटीपीसीआर आणि ४२२ रॅपीड टेस्ट करण्यात आल्या आहेत़ यापैकी केवळ आठजणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ चार तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही़

प्रशासनासह आराेग्य विभागाची खबरदारी

जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग हाेऊ नये, यासाठी प्रशासन व आराेग्य विभागाने उपाययाेजना सुरू केल्या आहेत़

रुग्ण संख्या कमी झाली असली तरी प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर काेराेनाची तपासणी करण्यात येत आहे़ तसेच नुकताच आराेग्य सर्व्हेही करण्यात आला आहे़

काेराेना संसर्ग कमी हाेताच आराेग्य प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे़ १८ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू झाल्याने माेहिमेला वेग आला आहे़

अनलाॅक प्रक्रीयेंतर्गंत व्यवहार सुरळीत करण्यात आले असले तरी नियमांचे पालन करण्याचे आवाहन आराेग्य व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे़

Web Title: Corona's 'Delta Plus' raises concerns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.