बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; १५० नवे पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:27 PM2020-09-07T19:27:35+5:302020-09-07T19:27:43+5:30

कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी तब्बल १५० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Corona's havoc continues in Buldana district; 150 new positives | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; १५० नवे पॉझिटीव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; १५० नवे पॉझिटीव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी तब्बल १५० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ९९५ वर पोहचली असून त्यापैकी २ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसे आजपर्यंत जिल्ह्यात ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेले एकूण ५३० अहवाल प्राप्त झाले.
पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जळगांव जामोद शहरातील पाच, जळगांव जामोद तालुका खेर्डा येथील १६, उसरा येथील एक, पिं. काळे एक, मडाखेड एक, मोताळा तालुका धा. बढे येथील एक, मोताळा शहरातील तीन, मलकापूर शहरातील सहा, आदर्श कॉलनी येथील एक, चाळीस बिघा येथील एक, लख्खानी चौक एक, विष्णूवाडी एक, लक्ष्मी नगर एक, रजत नगर एक, मलकापूर तालुका तालसवाडा एक, दे. राजा तालुका गारखेडा एक, अंढेरा दोन, खैरव तळेकरएक, दे. मही तीन, गारगुंडी सहा, दे. राजा शहर एक, चिखली रोड एक, योगीराज नगर एक शिवाजी नगर एक, शिंगणे नगर एक, मेहकर शहर एक, मेहकर तालुका डोणगांव चार, गणपूर एक, मादनी दोन, कल्याणा एक, नांदुरा शहर एसबीआय बँकेजवळ एक, नांदुरा तालुका निमगांव दोन, नायगांव दोन, चिखली शहर पाच, चिखली तालुका कोनड खु तीन,गांगलगांव दोन, भालगांव एक, बुलडाणा शहर १०, केशव नगर पाच, जुनागाव एक, पोलीस लाईन एक, सुंदरखेड चार, पोलीस वसाहत एक, खामगांव शहर दोन, शिवाजी नगर एक, सावजी ले आऊट चार, चांदे कॉलनी दोन, जगदंबा रोड एक, पुरवार गल्ली दोन, फरशी एक, घाटपुरी नाका तीन, सिंधी कॉलनी एक, कृषी कार्यालय एक, सती फैल एक, खामगांव तालुका अटाळी एक , लाखनवाडा पाच, बुलडाणा तालुका मातला एक, भादोला एक, केसापूर चार, नांद्राकोळी दोन,धाड दोन,कोळेगांव एक, भोकरदन जि. जालना एक आदींचा समावेश आहे.


१०५४ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत २० हजार ४२९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ हजार ४४४ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात आज अखेर एकूण तीन हजार ९९५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी दोन हजार ८८३ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात एक हजार ५४ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ५८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title: Corona's havoc continues in Buldana district; 150 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.