जानेफळ येथे कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:22 AM2021-02-22T04:22:35+5:302021-02-22T04:22:35+5:30
गेल्या तीन दिवसांपासून जानेफळ येथे सारखेच कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. एका कुटुंबातील सहा, दुसऱ्या कुटुंबातील आठ आणि ...
गेल्या तीन दिवसांपासून जानेफळ येथे सारखेच कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. एका कुटुंबातील सहा, दुसऱ्या कुटुंबातील आठ आणि तिसऱ्या कुटुंबातील चार तसेच इतर चार याप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. यामुळे जनतेत भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने संपर्कातील लोकांच्या चाचण्यांवर भर दिला जात असून शनिवार, २० फेब्रुवारी रोजी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई, डॉ. स्वप्नील चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ४७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या. ह्या सर्व चाचण्या प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी भरणारा आठवडी बाजार सुद्धा बंद ठेवण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा आकडा वाढत असला तरी कुठलीही खबरदारी न बाळगता नागरिक मात्र बिनधास्त फिरत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर मात्र कोणीच करताना दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.