महाप्रसादाला कोरोनाची बाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:26+5:302021-02-05T08:30:26+5:30

महाप्रसाद बनविण्यास पौष वद्य षष्ठीला ब्रह्ममुहूर्तावर (पहाटे साडेतीन-चार वाजता) प्रारंभ होत असे. तब्बल १५१ क्विंटल गहूपुरी व १०१ ...

Coronation hinders Mahaprasada! | महाप्रसादाला कोरोनाची बाधा!

महाप्रसादाला कोरोनाची बाधा!

Next

महाप्रसाद बनविण्यास पौष वद्य षष्ठीला ब्रह्ममुहूर्तावर (पहाटे साडेतीन-चार वाजता) प्रारंभ होत असे. तब्बल १५१ क्विंटल गहूपुरी व १०१ क्विंटल वांगेभाजीचा हा महाप्रसाद बनविण्यासाठी परिसरातील ५० पेक्षा जास्त गावांतील महिला-पुरुष, साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिकी शाळेसह ५०० शिस्तबद्ध विद्यार्थ्यांचे स्वयंसेवक दल आणि विवेकानंद आश्रमाचे कार्यकर्ते आपली सेवा देतात. तब्बल १५ तास महाप्रसादनिर्मितीची ही प्रक्रिया सुरू असते. युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवाची सांगता लाखाची महापंगत म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या महाप्रसाद वितरणाने होत असे. त्या महाप्रसाद निर्मितीस पहाटे साडेतीन ते चार वाजेच्यादरम्यान सुरुवात होत असून, त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात येत असे.

अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातून व परिसरातील ५० पेक्षा जास्त गावांतील महिला-पुरुष हिवरा आश्रम येथे दाखल होतात. साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिकी शाळा व अ‍कॅडमीचे अध्यक्ष अर्जुनराव गवई यांच्यासह त्यांचे ५० कर्मचारी व विद्यार्थी यासह देऊळगावमाळी येथील महात्मा फुले विद्यालय, विवेकानंद महाविद्यालय एकलारा, राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय साखरखेर्डा, गुरुकृपा विद्यालय सावरखेड व गणपूर, शिवाजी विद्यालय लव्हाळा, शाहू महाराज विद्यालय पेनटाकळी व परिसरातील प्राथमिक शाळांचे तब्बल ५०० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून महाप्रसाद निर्मितीत सहभाग देतात. यावर्षी काेराेनामुळे महाप्रसादाला काेराेनाची बाधा झाली आहे.

Web Title: Coronation hinders Mahaprasada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.