होळीच्या सणावर कोरोनाचे सावट - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:35 AM2021-03-27T04:35:52+5:302021-03-27T04:35:52+5:30
पारंपारिक धार्मिक रूढी या सणात अजूनही जोपासल्या जात असल्याने हा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये ...
पारंपारिक धार्मिक रूढी या सणात अजूनही जोपासल्या जात असल्याने हा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये हा सण पाच दिवसाचा, तर काही गावात सात दिवसाचा साजरा करण्यात येतो. हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असणारे चाकरमानेदेखील मोठ्या प्रमाणात आपल्या गावी कुटुंबासह येत असल्याने गावेदेखील माणसांनी फुलून जायची. विविध सांस्कृृृतिक कार्यक्रमाची रेलचेल या सर्वांचेच मनोरंजन व्हायचे. पण गेल्यावर्षी होळीच्या सणावरच्या तोंडावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने होळी सणावर बंदी आली होती. कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नसल्याने यावर्षीदेखील शासनाकडून सणावर बंदी घातल्याने होळीचा सण साध्या पद्धतीनेच साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी रंगाची उधळण करणाऱ्या होळीच्या सणातील रंग फिके पडणार असल्याचे चित्र आहे.