कोरोनावीर आशा व आरोग्य सेविकांचा साडी-चोळी देवून गौरव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:21 AM2021-03-29T04:21:03+5:302021-03-29T04:21:03+5:30
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी कोरोना योद्ध्यांना समर्पित करून साधेपणाने वाढदिवस साजरा केला आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ...
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी कोरोना योद्ध्यांना समर्पित करून साधेपणाने वाढदिवस साजरा केला आहे.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील अशाच पध्दतीने पुढाकार घेत मतदारसंघात प्रामुख्याने कारोना योध्द्यांचा सत्कार, रक्तदान आदी उपक्रम राबविले. यामध्ये भाजपाचे बुलडाणा तालुकाध्यक्ष अॅड. सुनिल देशमुख यांनी मासरूळ जि.प.सर्कलमधील आशा व आरोग्य सेविकांचा साडी-चोळी देवून केलेला गौरव विशेष उल्लेखनिय ठरला. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, योगेश राजपूत कल्याण कानडजे, श्याम शिमब्रे, डॉ.खेडेकर, विशाल विसपुते, रामदास कानडजे, जितेंद्र जैन, अनिल जाधव, दिगंबर राजगुरू यांच्यासह धाड व मासरूळ सर्कलमधील भाजपाचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. धाड येथील देशमुख मंगल कार्यालयात २७ मार्चला पार पडलेल्या कार्यक्रमात ७० आरोग्य सेविका, आशा सेविकांचा साडीचोळी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या जीवघेण्या संकटकाळात आपल्या जीवाची बाजी लाऊन आरोग्य सेवा दिली, त्यामुळे त्यांच्या या कायार्ची प्रत्येकाने दखल घेत त्यांना सन्मान देणे आवश्यक आहे. कोरोनायोद्ध्यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, यापुढेही त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही यावेळी अॅड.सुनील देशमुख यांनी दिली. (वा. प्र.)
धाड ग्रामीण रूग्णालयातील कोरोना योध्दयांचा सत्कार
आशा व आरोग्य सेविकांच्या गौरवासह अॅड. सुनिल देशमुख यांनी धाड ग्रामीण रूग्णालयात कार्यरत कोरोना योध्द्यांचा सत्कार केला. रूग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
२५ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन आ.श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमीत्त मासरूळ व धाड जि.प.सर्कल मध्ये आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले. यावेळी अॅड.सुनिल देशमुख तसेच देविदास पाटील, संदीप उगले, योगेश राजपूत उपस्थित होते. यामध्ये धामणगाव, जामठी, चांडोळ, कुंबेफळ, टाकळी व कुलमखेड येथे प्रत्येकी पाच लक्ष रूपये किमतीच्या सिमेंट रस्त्याचे काम पार पडणार आहे.