CoronaVirus : मलकापूरात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:48 AM2020-06-16T10:48:39+5:302020-06-16T10:49:17+5:30

तब्बल ११ रुग्ण हे एकट्या मलकापूर तालुक्यातील असून मलकापूर शहरातील नऊ कोरोना बाधीतांचा यात समावेश आहे.

CoronaVirus: 11 positive in a single day in Malkapur | CoronaVirus : मलकापूरात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

CoronaVirus : मलकापूरात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/मलकापूर : जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील तब्बल ११ रुग्ण हे एकट्या मलकापूर तालुक्यातील असून मलकापूर शहरातील नऊ कोरोना बाधीतांचा यात समावेश आहे.
अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी १३२ अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यापैकी १२० अहवाल निगेटीव्ह असून १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, पॉझिटिव्ह अहवालापैकी नऊ अहवाल हे एक्या मलकापूर शहरातील आहेत. यात मलकापूरातील भीमनगरात राहणाऱ्या १६ व २० वर्षीय तरुणी, नऊ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पारपेठमधील ४३ आणि ५९ वर्षीय पुरुष तर हेडगेवारनगरमधील एका ३६ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर हनुमान चौकातील आठ महिन्याच्या बाळासह २७ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. धोंगर्डी येथील ७० वर्षीय महिला व ६२ वर्षाच्या व्यक्तींही कोरोना संक्रमीत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे लोणार तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ब्राम्हण चिकना येथे आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला. सोमवारी एकूण १२ व्यक्ती बाधीत असल्याचे अहवाल समोर आले.
त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे कोवीड रुग्णालयात उपचार घेवून बरे झालेल्या चार रुग्णांना सुटी देण्यात आली. यात शेलापूर येथील दोघे, बुलडाण्यातील मच्छी ले आऊटमधील व्यक्ती आणि मलकापूरमधील भीमनगरमधील २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांपैकी ८१ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये ४४ व्यक्तींवर उपचार करण्यात येत आहे.
आजपर्यंत १,८७२ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर एकूण कोरोना बाधीतांची संख्या १३० वर पोहोचली आहे. पैकी पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
सध्या १८ अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.


आठ महिन्याचे बालकही कोरोना बाधीत
मलकापूर शहरातील हनुमान चौक या प्रतिबंधीत क्षेत्रातील अवघ्या आठ महिन्याच्या बालकालाही कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. या मुलाचे वडील कोरोना बाधीत आढळून आले होते. त्यानंतर महिला व तिचे हे आठ महिन्याचे चिमुकले बाळ बाधीत निघाले.
हेडगेवार मलकापूर तालुक्यातील १४ वे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून समोर येत आहे. ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील व्यक्ती बाधीत झाला. त्याच्याकडून हेडगेवार नगरमधील व्यक्ती बाधीत झाला असल्याने बाधिताची आई, वडील व पत्नी यांना क्वारंटीन करणतत आले.
संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न
बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक सॅम्पलींग हे मलकापूर तालुक्यात झाल्याचा अंदाज आहे. संदिग्ध सर्वच रुग्ण इंस्टीट्युशनल क्वारंटीन करण्यात येऊन चेन ब्रेक करण्यात येतेय.

Web Title: CoronaVirus: 11 positive in a single day in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.