CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२० पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:31 PM2020-10-05T19:31:02+5:302020-10-05T19:31:14+5:30

CoronaVirus in Buldhana : कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ७६८ वर पोहचली

CoronaVirus: 120 more positive in Buldana district | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२० पॉझिटीव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२० पॉझिटीव्ह

Next

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी १२० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. २६५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ७६८ वर पोहचली आहे.आतापर्यंत ६ हजार ६५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १०१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण ३८५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६५अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १२० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ११४ व रॅपिड टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २२७ तर रॅपिड टेस्टमधील ३८ अहवालांचा समावेश आहे.  
     पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये  मेहकर शहरातील सात  , मेहकर तालुका   दे .माळी १ , जानेफळ ७ , शेलगांव काकडे १, मोळा १,  सिं. राजा तालुका आडगांव राजा २, पिंपळखुटा ४, देऊळगांव कोळ ३, साखरखेर्डा १, दुसरबीड ६, शिंदी ३, जागदरी १ ,    सिं. राजा शहरातील १, खामगांव शहरातील ३ , खामगांव तालुका  हिंगणा १, नांदुरा शहरातील ३, नांदुरा तालुका  येरळी २, वाडी १, दहीगांव १, माळेगांव गोंड १,  दे. राजा शहर ११, दे. राजा तालुका   सातेगांव सावंगी ४, गोंधनखेड १, अंढेरा १,  लोणार शहर २, लोणार तालुका   जांभूळ १, रायगांव १, सावरगांव मुंढे २, आधा २,  सुलतानपूर २, चिखली तालुका  अमडापूर १, शेलगांव १, कोलारा १, सावरखेड १,  चिखली शहर ११, मोताळा शहर १, बुलडाणा शहर १२,  बुलडाणा तालुका  चौथा १, वरवंड १, रायपूर २, घाटनांद्रा १, मलकापूर शहर १,  मलकापूर तालुका  वडोदा १, दसरखेड २,  पिंपळखुटा १, बेलाड १, अनुराबाद १, मूळ पत्ता मानकरखेड ता. बाळापूर जि. अकोला येथील १ व पुणे येथील १ संशयीत रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज १४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यामध्ये   बुलडाणा  आयुर्वेद महाविद्यालय ३५, खामगांव : १५, मेहकर  १५,  शेगांव १, दे. राजा १६, जळगांव जामोद  ०१, संग्रामपूर १, सिं. राजा ३, चिखली २१ , नांदुरा  १५, लोणार ४, मलकापूर १३ आदींनी कोरोनावर मात केल्याने सुटी देण्यात आलीआहे.


१०१५ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ७ हजार ७६८वर पोचली असून त्यापैकी ६ हजार ६५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १०१५ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.   तसेच आजपर्यंत ३२ हजार १५३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.आजरोजी  ६११  अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ९९  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: CoronaVirus: 120 more positive in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.