CoronaVirus : खामगाव शहरातील पॉझिटिव्ह महिलेचे १३ नातेवाईक क्वारंटीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:52 AM2020-05-18T11:52:44+5:302020-05-18T11:52:52+5:30
शहरातील जिया कॉलनी परिसरातील ६५० कुटुंबियांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रविवारी सायंकाळी शहरातील जिया कॉलनीतील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर, या महिलेच्या १३ नातेवाईकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. तिच्या संपर्कातील सर्वच १३ जणांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे शहरातील जिया कॉलनी परिसरातील ६५० कुटुंबियांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
खामगाव शहरातील समन्वय नगर भाग-२ परिसरातील जिया कॉलनी, मिल्लत कॉलनी, टिचर्स कॉलनी, हरिफैल या भागाचा कन्टेटमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर रविवारी पहाटे पासून या भागातील कुटुंबियांच्या सर्व्हेक्षणास सुरूवात करण्यात आली. या भागातील सुमारे ६५० कुटुंबियांची तपासणी केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना या परिसरात केल्या जात आहे.
शहरातील जिया कॉलनीत एक महिला पॉझीटीव्ह आढळल्यानंतर या परिसरात निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे. त्यानंतर या परिसरातील कुटुंबियांचीही तपासणी केली जात आहे.
- धनंजय बोरीकर
मुख्याधिकारी, खामगाव