CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी १७ पॉझीटीव्ह; रुग्णसंख्या २३०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:46 AM2020-06-30T10:46:12+5:302020-06-30T10:46:19+5:30
जिल्ह्यातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जून रोजी समोर आले आहे
बुलडाणा : जिल्ह्यातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जून रोजी समोर आले आहे. ७७ जणांचे अहवाल निगेगिटीव्ह आले असून तीघांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ९४ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील ७२ वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार येथील ५५ वर्षीय महिला व २३ वर्षीय पुरूष, धोत्रा भणगोजी ता. चिखली येथील ५० वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील ४८ वर्षीय पुरूष व सरंबा ता. दे.राजा ४९ वर्षीय पुरूष रूग्णांच्या अहवालाचा समावेश आहे.
तसेच मंगल गेट मलकापूर येथील १७ वर्षीय तरूण, २७ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, ३१ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरूष व आळंद ता. मलकापूर येथील १९ वर्षीय महिला संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच बस स्थानका जवळ खामगांव येथील ३४ वर्षीय महिला, खामगांव येथील ४० वर्षीय पुरूष, १४ वर्षीय युवक, ३५ वर्षीय महिला व ७८ वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे १७ अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
तसेच आज तीन रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये संग्रामपूर येथील ३३ वर्षीय पुरूष,३८ वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत २५११ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १४७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आज २९ जुन रोजी ९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. सध्या १०० नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण २३० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १४७ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ७२कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ११ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
खामगावात पाच रुग्ण
खामगाव शहरात एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगळण्याचे आवाहन केले आहे.