CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी २१ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:29 PM2020-08-17T19:29:44+5:302020-08-17T19:30:00+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून १७ आॅगस्ट रोजी आणखी २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून १७ आॅगस्ट रोजी आणखी २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच ८४ अहवाल निगेटिव्ह आले असून ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या २२५२ वर पोहचली असून १३९९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ८४ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १५ व रॅपिड टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १८ तर रॅपिड टेस्टमधील ६६ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ८४ अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील गाडगे नगर येथील एक , सरस्वती नगर एक, विष्णूवाडी एक, माळेगांव ता. मोताळा एक, हनवतखेड ता. सिं.राजा येथील दोन, खामगांव येथील एक , लालपूरा एक, सुदर्शन नगर एक, गोपाल नगर चार , सुटाळा दोन, वाडी दोन, भालेगांव बाजार ता. खामगाव येथील तीन, जोशीनगर एक संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. तसेच आज ४६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रुग्णांमध्ये खामगांव पोलीस वसाहतीतील दहा , जानकी कॉम्प्लेक्स एक, सुटाळा एक, शिक्षक कॉलनी दोन, शंकर नगर एक, सती फैल दोन, झोडगा वसर ता. खामगांव एक , पिं.काळे ता. जळगांव जामोद येथील एक, सुलतानपूर ता. लोणार येथील एक , मेहकर येथील सहा, जानेफळ ता. मेहकर येथील एक, घाटबोरी ता. मेहकर येथील एक , लोणार येथील १० , चिखली येथील सहा , येसापूर ता. लोणार येथील एक, दहीफळ ता. लोणार येथील एक रुग्णाचा समावेश आहे.
२४३ अहवाल प्रतिक्षेत
आजपर्यंत १४ हजार २१६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३९९ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण २२५२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १३९९ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८१३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ४० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.