CoronaVirus : अफवा पसरविणाऱ्यांवर २४ तास नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:11 AM2020-04-15T11:11:30+5:302020-04-15T11:11:46+5:30
अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात जवळपास १७६ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा : कोरोनाची भीती सर्वांमध्येच निर्माण झाली आहे. ही दशहत वाढवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर काही लोकांकडून होत आहे. कोरोना बाबत अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात जवळपास १७६ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाबत समाजमाध्यमांवरून अफवा पसरविणाऱ्यांवर सध्या सयबर सेल २४ तास नजर ठेवून आहे.
कोरोनामुळे सर्व देश हादरला आहे. आरोग्य विभाग, पोलीस विभागासह शासनाच्या विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कोरोना निर्मुलनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या उपाययोजनाचे उल्लंघनही काही नागरिकांकडून होत आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची चर्चा असल्याने सोशल मीडियावरही कोरोनाबाबतच्या विषयांना हवा मिळत आहे. व्हॉट्स अॅप, फेसबूक, टिष्ट्वटर, टीक टॉक यासारख्या समाजमाध्यमावरून कोरोनाबाबतचे संदेश व्हायरल होत आहेत. परंतू यामध्ये काही संदेश अफवा पसरविणारे राहत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची अधिक भीती घालून दिल्या जात आहे. सोशल मीडियावरून कोरोनाबाबतच्या अशा अफवा पसरविणाºयांवर महाराष्ट्राचा सायबर सेल लक्ष ठेवून आहे. याप्रकरणी ९ एप्रिल पर्यंत विविध पोलीस स्टेशनमध्ये १६१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये सातत्याने वाढ होत असून, आतापर्यंत राज्यात १७६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरोपीची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही पाच गुन्हे
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही कोरोना बाबत अफवा पसरविण्याचे प्रकार समोर येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करून अफवा पसरविणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जामोद, खामगाव (शिवाजी नगर), चिखली, बुलडाणा तालुक्यातील रायपूर व मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोशल मीडियावरून कोरोनाबाबत अफवा पसरविणाºयांवर सोशल मीडिया मॉनीटरींग सेल लक्ष ठेवून आहे. २४ तास सायबर सेलची नजर असते. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोट्या, दिशाभूल करणाºया अफवा पसरू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-दिलीप भूजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा.