CoronaVirus : टांझानियातून आलेले ७ जण क्वारंटीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:55 AM2020-06-10T10:55:00+5:302020-06-10T10:55:07+5:30
टांझानिया येथून वंदे भारत अंतर्गत आलेल्या ७ जणांना येथील अंजुमन हायस्कुलमध्ये क्वारंटीन करण्यात आले आहे.
खामगाव : कोरोनो महामारीच्या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान टांझानिया येथून वंदे भारत अंतर्गत आलेल्या ७ जणांना येथील अंजुमन हायस्कुलमध्ये क्वारंटीन करण्यात आले आहे. भारतातून परदेशात गेलेल्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने वंदे भारत मिशन अंतर्गत परत आणल्या जात आहे. याच मिशन अंतर्गत टांझानिया येथे गेलेले ७ जण बुलडाणा जिल्ह्यात परतले आहेत. दरम्यान, या ७ जणांना येथील जलंब नाका स्थित अंजुमन हायस्कूल येथे क्वारंटीन करण्यात आले आहे. या सर्वांना गेल्या सात ते आठ दिवसांपासून क्वारंटीन केले गेले आहे. सोमवार ८ जून रोजी या सर्वांच्या तपासण्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आल्या. सोबतच त्यांचे स्वॅब नमुनेही तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. दरम्यन, बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ७०३ व्यक्ती परदेशातून आले आहेत. पैकी एक जण कोरोना बाधीत असल्याचे समोर आले. संबंधीत युवक फिलिपाईन्समधून आला होता. क्वारंटीन कालावधी संपण्याच्या एक दिवस अगोदरच तो घरी निघून गेला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात बुलडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा रुग्णही कोरोना मुक्त झाला आहे.