CoronaVirus : बुलडाण्यात एकाच दिवशी ८० पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १३४८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 11:06 AM2020-08-02T11:06:01+5:302020-08-02T11:08:21+5:30
वर्तमान स्थितीत ४८८ बाधीतांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शनिवारी जिल्ह्यात संदिग्ध रुग्णांच्या तपासणीदरम्यान ८० जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १३४८ वर पोहोचली असून वर्तमान स्थितीत ४८८ बाधीतांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गेल्या २४ तासात एकूण ३८७ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ३०७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालापैकी ७२ ्हवाल हे प्रयोगशाळेतील तपासणीदरम्यान तर आठ जणांचे अहवाल हे रॅपीड टेस्टमद्ये पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये मेहकरमध्ये सात, लोणी गवळी येथे ११, घाटबोरी येथे तीन, नांदुरा येथे पाच, चिखलीमधील सवणा येथे १३, धाडमध्ये सहा, बुलडाण्यात दोन, देऊळगाव मही येथे दोन, खामगावमध्ये २३, शेगाव तालुक्यातील माटरगावमध्ये एक, देऊळगाव राजामध्ये पाच, बावनबीरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. या प्रमाणे एकूण ८० जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
दुसरीकडे शनिवारी ४२ जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा येथील सहा शेगावातील दहा, नांदुरा येथील एक, जळगाव जामोदमधील सहा, बुलडाणा येथील चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. मलकापूरमधील एक व्यक्तीही कोरोनामुक्त झाला आहे तर चिखलीमधील दोन पुरुष व एक महिला तर खामगावमधील दोन महिला आणि सात पुरुषांना कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या नऊ हजार २२२ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आजपर्यंत जिल्हयातील ८३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ११८ अहवाल अद्याप बाकी आहेत.
६२ टक्के रुग्ण कोरोना मुक्त
जिल्ह्यात कोरोनाबाधीत आढळून आलेल्या १३४८ रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ८३० च्या आसपास या रुग्णांची संख्या आहे. दुसरीकडे अद्यापही ११८ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधीतांचा मृत्यूदर हा वर्तमान स्थिीत २.२२ टक्के असून आजपर्यंत जिल्ह्यात ३० कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे.