CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू, १३२७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:37 AM2021-04-28T11:37:05+5:302021-04-28T11:37:15+5:30
CoronaVirus: ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १,३२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १,३२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६,८६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५,५३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २८७, खामगावातील ९९, शेगावमधील ५१, देऊळगाव राजातील १५१, चिखली तालुक्यातील १०६, मेहकर तालुक्यातील १६९, मलकापूर तालुक्यातील ७०, नांदुऱ्यातील ८०, लोणारातील १०२, मोताळ्यातील ६४, जळगाव जामोद ५४, सि. राजा ९१ आणि संग्रामपूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरोनामुळे बुलडाणा शहरातील श्यामनगरमधील ५० वर्षीय व्यक्ती शेगावातील गायत्रीनगरमधील ७१ वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील अन्वी येथील ७१ वर्षीय व्यक्ती, चिखली येथील ८० वर्षीय महिला, पिंपळगाव सराई येथील ७२ वर्षीय महिला व ७५ वर्षीय पुरुष, बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील ७७ वर्षीय व्यक्ती, सिंदखेड राजा तालुक्यातील वाकद जहांगीर येथील ५५ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ७० वर्षीय महिला आणि नांदुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान मंगळवारी ६५५ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ४३ हजार ६४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ५३ हजार ६७० जणांनी कोरोनावर मात केली.