CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ३३ पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:46 PM2020-11-10T12:46:40+5:302020-11-10T12:46:50+5:30

CoronaVirus in Buldhana : जिल्ह्यात आतापर्यंत १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

CoronaVirus: Another dies in Buldana district, 33 positive | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ३३ पाॅझिटीव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ३३ पाॅझिटीव्ह

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून ३३ जणांचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच ८३ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तसेच ४९१ अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५२४ अहवाल साेमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४९१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. 
     पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णाध्ये खामगांव शहरातील ५  , खामगांव तालुक्यातील पळशी १,  लाखनवाडा १, वाकुड १, घानेगांव १, बुलडाणा शहरातील १, मोताळा शहर १, मोताळा तालुका  बोराखेडी ५, चावर्दा २, थड २, गिरोली १, जयपूर १, अटारी १, सिं. राजा तालुका रूम्हणा २, शेगांव तालुका : गव्हाण २, जवळा २ लोणार तालुका  शारा १, मेहकर शहर ३ आदींचा समावेश आहे.  तसेच उपचारादरम्यान मोताळा येथील ४२ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच काेरेानावर मात केल्याने खामगांव  काेविड सेंटरमधून २६ , बुलडाणा  आयुर्वेद महाविद्यालय १७, अपंग विद्यालय १, लोणार ९, मोताळा १०, दे. राजा ११, मलकापूर ४, सिं. राजा ३, नांदुरा २ रुग्णांचा समावेश आहे. 
  तसेच आजपर्यंत ५२ हजार ९९१ अहवाल  निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ९ हजार ४०४  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज राेजी ४ हजार १७१  नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९ हजार ९४० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ९ हजार ४०४  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ४०५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १३१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

Web Title: CoronaVirus: Another dies in Buldana district, 33 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.