CoronaVirus in Buldhana : एकाच दिवशी १०४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,३५६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:27 PM2020-08-18T19:27:16+5:302020-08-18T19:27:21+5:30
जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल १०४ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल १०४ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या ही २,३५६ झाली आहे. पैकी आतापर्यंत १,४४९ जणांनी कोरोनावर मात केल्याचे एक सुखद चित्र असून वर्तमान स्थितीत ८६७ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्टमधील मिळून एकूण २५९ जणांचे अहवाल १८ आॅगस्ट रोजी आले होते. त्यापैकी १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमधील १३ महिला, २७ पुरुष असे एकूण ४० तर आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोवीड केअर सेंटरमधील सहा पुरुष, तीन महिला पॉझिटिव्ह आल्या. मेहकर कोवीड सेंटरमधील चार पुरुष, सात महिला असे एकूण ११ जण, नांदुरा सेंटरमधील सात पुरुष, मलकापूर सेंटरमधील दोन महिला, तीन पुरुष असे एकूण पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. खामगाव कोवीड सेंटरमधील दहा महिला, १५ पुरुष असे एकूण २५ जण तर सिंदखेड राजा कोवीड सेंटरमधील तीन, शेगावमधील दोन, देऊळगाव राजामधील दोन या प्रमाणे १०४ या सेंटर अंतर्गत पॉझिटिव्हआले आहेत.दुसरीकडे ५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येथून दहा महिला व सहा पुरुष असे एकूण १६, देऊळगाव राजा कोवीड सेंटरमधील चार महिला, जळगाव जामोद सेंटरमधील तीन, खामगाव सेंटरमधील नऊ, लोणारमधील सहा, मेहकरमधील एक, नांदुऱ्यामधील एक, शेगावमधील सहा आणि खामगाव शासकीय सामान्य रुग्णालयातील कोवीड सेंटरमधून तीन तर बुलडाणा येथील महिला रुग्णालयातून एका जणाचा समावेश आहे. हे ५० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांपैकी आतापर्यंत १४ हजार ३७१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
१,४४९ जणांना रुग्णालयातून सुटी
आतापर्यंत १,४४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दुसरीकडे अद्यापही १२३ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत असून वर्तमान स्थितीत जिल्ह्यात एकूण २,३५७ रुग्ण संख्या असून त्यापैकी १,४४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ८६७ बाधीत रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तर ४० जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.